तक्रारीनंतरही खड्डे न बुजवल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : औरंगाबाद खंडपीठ | ABP Majha
तक्रारीनंतरही खड्डे न बुजवल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेशच औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.
जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टानं हे आदेश दिलेत.
औरंगाबाद शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रार केली, आणि १० दिवसांत दखल घेतली गेली नाही तर पोलिसांनी ३ दिवसांत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितलंय. त्यामुळे खड्डे न बुजवणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत.