
Aurangabad Police Bharti: पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान डमी परीक्षार्थीला अटक, पोलिसांची कारवाई
Continues below advertisement
औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी येतीय. पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान डमी परीक्षार्थीला अटक करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे, नऊ लाख रुपयांच्या बदल्यात ही व्यक्ती डमी परीक्षार्थी बनली होती. मूळ विद्यार्थी विकास शेळके याच्याऐवजी अविनाश गोमलाडू हा परीक्षेला बसला होता. दरम्यान, अविनाशकडून ब्लू-टुथ डिव्हाईस, मख्खी एअरफोनसह मोबाईल जप्त करण्यात आलाय.
Continues below advertisement