Aurangabad Police : सहय्याक पोलीस आयुक्त Vishal Dhume यांच्यावर विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल

Continues below advertisement

Aurangabad Police : सहय्याक पोलीस आयुक्त Vishal Dhume यांच्यावर विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल

औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडवून देणारी बातमी  -  औरंगाबाद शहर पोलीस दलातील 'एसीपी'वर शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईट ड्युटीवर असतांना या पोलीस अधिकाऱ्याने रात्री 2 वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याच्या त्यांच्यावर आरोप  तर याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ढुमे  हे औरंगाबाद क्राईम ब्रँच एसीपी आहेत. ते रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिले. तिथे त्यांना त्यांचा एक मित्र भेटला. त्यांना त्यांनी माझ्याकडे गाडी सोडण्याची विनंती केली. पत्नीसोबत असलेल्या व्यक्तीने ढुमे यांना मागच्या सीटवर बसवलं. त्यानंतर त्यांनी त्या महिलेची गाडीतच छेड काढायला सुरुवात केली. पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली . मला वॉशरूमला जायचे तुमच्या घरी घेऊन जा म्हणले. पोहोचल्यानंतर आपल्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे म्हणत वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. तिथेही महिलांची छेडछाड केली. आणि पतीला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram