Aurangabad Vaccination: औरंगाबादचा लसीकरण पॅटर्न राज्यभरात? सरकारी सुविधांसाठी लस घेणं अनिवार्य
राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं आणखी निर्बंध घालण्याचा विचार सुरू केलाय. सरकारी सेवा हव्या असतील तर त्यासाठी लसीकरण अनिवार्य करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. औरंगाबादमध्ये इंधन आणि रेशन मिळवायचं असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आलंय. हाच औरंगाबाद पॅटर्न आता राज्यभरात लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.