Aurangabad Protest : महापुरुषांचे अपमान, महागाईवरुन राष्ट्रवादी आक्रमक, औरंगाबादेत आंदोलन
Aurangabad Protest : महापुरुषांचे अपमान, महागाईवरुन राष्ट्रवादी आक्रमक, औरंगाबादेत आंदोलन
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत आहे. वाढलेली महागाई, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, रोजगाराचा प्रश्न, सातत्याने शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांबाबत येणारी बेताल वक्तव्य महिलांचा अवमान,या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रोश आंदोलन करत आहे.