BJP MP Bhagwat Karad | भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला

औरंगाबादेत भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यावरच हल्ला करण्य़ात आलाय. वॉर्डात निर्जंतुकीकरण केल्यानं भागवत कराड यांच्या मुलांनी मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते कुणाल मराठेंनी केलाय. औरंगाबादेतल्या कोटला कॉलनीत रात्री ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हीडिओ आता व्हायरल होतोय. तर कुणाल मराठेच्या तक्रारीनंतर औरंगाबाद पोलिसांनी हर्षवर्धन आणि वरूण कराड या दोन मुलांसह सोनवणे नामक व्यक्तीवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. तर, हे मुला मुलांचे भांडण आहे..पोलिस चौकशी करत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार भागवत कराड यांनी माझाशी बोलताना दिली आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola