Coronavirus | औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीतील दोन कंपन्यांमधल्या 40 कर्मचारी कोरोनाबाधित

Continues below advertisement
औरंगाबादमध्ये रोज 100 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब असतानाच आता कोरोनाने इंडस्ट्रीमध्ये देखील शिरकाव केलेला आहे. औरंगाबाद वाळूज एमआयडीसीतील नामांकित बजाज कंपनी मध्ये गेल्यात पाच-सहा दिवसात 20 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर याच भागातील स्टारवेज नावाच्या कंपनीत ही 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर वाळूज पंढरपूर भागात दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. बजाज कंपनीने जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या आजूबाजूला काम करणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांना होम क्वॉरंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram