Aurangabad : औरंगाबादच्या क्रांती चौकात 'महाशिववादना'चं आयोजन, सोहळ्यात 15 ढोलताशा पथकांचा सहभाग

Continues below advertisement

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. मुख्यमंत्री या सोहळ्यासाठी ऑनलाईन उपस्थित असतील. हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी शहरातील १५ ढोलताशा पथकांनी महा शिववादन या उपक्रमाचं आयोजन केलंय. यांत ५०० ढोल, २०० ताशे आणि अन्य वाद्यवृंदाचा सहभाग असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी चबुतरा बांधून त्यावर नवीन अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याची उंची २१ फूट असून त्याचे वजन ७ मेट्रीक टन इतकं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram