Coronavirus | राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर, औरंगाबादेतील महिलेला कोरोनाची लागण

Continues below advertisement
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 32 वर पोहचला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. औरंगाबादेतील 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. त्यामुळे आता राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्ण झाल्यानं देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचं राज्य महाराष्ट्र ठरतंय. कालच एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येतं 12 ने भर पडली आणि आता आज पुन्हा एक कोरोनाग्रस्त वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान राज्य सरकार आणि प्रशासनासमोर उभं ठाकलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram