Aurangabad : जोरदार पावसाने जटवाडा रोडवर पाणी, बंधारा फुटल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकले ABP Majha
औरंगाबाद मध्ये झालेल्या जोरदार पावसाने जटवाडा रोड वरील बंधारा फुटला त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले .आज जटवडा येथील एव्हरेस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये एम एस सी इ टी 2021 ची परीक्षा देण्यासाठी या सेंटरवरील सर्व विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या परीक्षेचा काय हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.. केवळ औरंगाबादच नाही तर नांदेड आणि इतर मराठवाड्याच्या भागातूनही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पोचले होते.. त्यातील नांदेड येथून आलेल्या एका विद्यार्थ्यांनी आपण कसे अडकलो आणि सेंटर पर्यंत पोहोचू शकलो नाहीत याची कैफियत सांगितली..