Devendra Fadanvis | जलयुक्त शिवार योजना बंद करू नका, अन्यथा मोठी लढाई लढू : देवेंद्र फडणवीस

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे.  या उपोषणासाठी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पंकजा मुंडे या मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचं काम पुढे नेत आहेत, असं म्हणत फडणवीसांनी पंकजा मुंडेंचं अभिनंदन केलं. तसेच जलयुक्त शिवार योजना बंद करु नये, जर या योजना पुढे नेल्या नाही तर मोठी लढाई लढू, असा इशाराही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला दिला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola