Aurangabad : दारुच्या नशेत कस्टम अधिकाऱ्यांची मुजोरी, बिअर शॉपमधील ग्राहकांना मारहाण ABP Majha

Continues below advertisement

 औरंगाबादेत एका बिअर शॉपीच्या दुकानात दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कामगार चौकातील बिअर शॉपीत हा प्रकार घडला. राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदावर असलेले भारत दौंड यांनी ही मारहाण केल्याचा आरोप होतोय. त्यांनी दारुच्या नशेत ही मारहाण केल्याचा आरोपही करण्यात येतोय. या मारहाणीचा व्हीडीओ समोर आलाय. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम यांनी चौकशी करणार असल्याची माहिती दिलीये. विशेष म्हणजे या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी एक जण मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गेला असता त्याला तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलीय़. या संदर्भात उत्पादन शुल्क अधिकारी भारत दौंड यांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

  •  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram