Aurangabad Crime : माता न तू वैरिणी; प्रेमात अडसर ठरल्याने आईकडून पोटच्या गोळ्याची हत्या ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. प्रेमात अडसर ठरणाऱ्या नऊ वर्षीय मुलाची आईनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केलीय. वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात ही धक्कादायक घटना घडलीय. संगीता रमेश बागुल आणि तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार अशी आरोपींची नाव आहेत. प्रियकराने मुलाला मोटरसायकलवर चक्कर मारतो म्हणून डोंगरावर नेऊन त्याचा खून केला. यानंतर आईनेच मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. काही दिवसानंतर तलवाडा शिवारातील डोंगरावर कुजलेल्या अवस्थेत मृत मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांना हा खून आईनेच केल्याचा संशय आला. पोलीसी खाक्या दाखवताच प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून केल्याची कबुली तिने दिलीय. पोलिसांनी संगीता बागूलला अटक केलीय.  तर अटकेच्या भीतीने तिच्या प्रियकराने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram