Aurangabad Crime | औरंगाबादमध्ये बहीण-भावाची हत्या, मारेकऱ्यांकडून घरातील दीड किलो सोन लंपास
बहीण-भावाच्या हत्येच्या घटनेनं औरंगाबाद हादरुन गेलं आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात या दोघांची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. मारेकऱ्यांनी घरातील दीड किलो सोने आणि रोख साडेसहा हजार पळवले, असल्याचीही माहिती आहे. किरण खंदाडे (18) आणि सौरभ खंदाडे अशी मृत बहीण भावाची नावं आहेत. आई वडील गावी गेल्याने घरात हे दोघे बहीण भाऊच घरी होते. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बहिण-भावांचे मृतदेह बाथरूममध्ये आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.