Aurangabad : RTO मधील भ्रष्टाचाराला चाप बसणार कसा? लाचखोर वरिष्ठ अधिकारी जामिनानंतर पुन्हा सेवेत
पहिल्या दिवशी लाचलुचपत विभागाचा ट्रॅप, दुसऱ्या दिवशी जामीन आणि तिसऱ्या दिवशी लाच घेणारा सेवेत रुजू असं घडलं आहे औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयात.आरटीओ कार्यालयातील स्वप्निल माने नावाच्या एआरटीओला ड्रायव्हिंग स्कूल कडून लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांचा जामीन झाला आणि ते तिसऱ्या दिवशी रुजू झाले. याचं कारण आहे वरिष्ठ अधिकार्याचे निलंबन करण्याचे नियम आणि कागदोपत्री खाच-खळगे.