Aurangabad: कोरोना लसीकरणातील सावळा गोंधळ सुरुच, मृत महिलेला लस ABP Majha
Continues below advertisement
दोन मे रोजी मृत्यू झालेल्या महिलेला सात महिन्यांनी म्हणजेच १८ डिसेंबरला कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आलाय. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये हा प्रकार घडलाय. उंडणगावातील ७८ वर्षीय पार्वताबाई पाटील यांचं २ मे रोजी निधन झालं. मात्र मृत्यूनंतर तब्बल सात महिन्यांनी पार्वताबाई यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्याचा मेसेज कुटुंबीयांना आला. त्यानंतर लसीकरणाचं प्रमाणपत्रही जारी करण्यात आलं. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement