Aurangabad Corona Update | दहावी, बारावीचे वर्ग वगळता औरंगाबादमधील शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद
Continues below advertisement
औरंगाबाद शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद महापालिका परीक्षेत्रात येणार्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या शाळेतील पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या वर्ग पूर्णपणे बंद असतील. दहावी आणि बारावीचे वर्ग मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू असतील. येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद असतील. याबरोबरच शहरात असणारे सर्व कोचिंग क्लासेस देखील आजपासून ते 28 तारखेपर्यंत बंद असतील. तसे परिपत्रक महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी काढले आहे.
Continues below advertisement