Aurangabad: निर्जन स्थळी जळलेले मृतदेह आढळले, ज्वलनशील पदार्थांमुळं दुर्घटना? ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबाद शहराजवळील गांधेली शिवारात निर्जन स्थळी एका कारमध्ये ३५ ते ४० वर्षीय महिला आणि पुरुष जळालेल्या अवस्थेत सापडले. गाडीमध्ये एसीचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटली असून गंगाधर आहेर आणि शालिनी बनसोड अशी त्यांची नावं आहेत. गंगाधर हे एका व्यावसायिकाकडे चालक म्हणून नोकरीला होते.  दुपारी १२ वाजता ते कार घेऊन गेले होते. काल दुपारी कारचा स्फोट झाल्याची माहिती या परिसरातील शेतकऱ्यानं पोलिसांना दिली. त्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि जळालेल्या अवस्थेतील दोघांनाही घाटी रुग्णालयात नेलं. तिथं दोघांना मृत घोषित करण्यात आलं. हा अपघात आहे की घातपात याचाही पोलीस तपास करत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram