Aurangabad Bulldozer : लेबर कॉलनी परिसरातील घरांवर बुलडोझर, जेसीबीच्या सहाय्यानं 338 घरं जमीनदोस्त
औरंगाबदच्या लेबर कॉलनी परिसरात मोडकळीस आलेली घरं जमीनदोस्त करण्यास सुरुवात झालीय. सकाळी साडेसहापासून ही पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाई सुरु झालीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी ३३८ घरं पाडण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीय. आज दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना इथं येण्यास बंदी करण्यात आली. इथल्या बहुतांशी नागरिकांनी घराचा ताबा सोडलाय. तर काही जण सोडण्याच्या तयारीत आहेत. मात्र तरीही काही नागरिक इथं राहत असून त्यांनी या पाडकामाला विरोध केलाय.