Aurangabad मध्ये भगर उत्पादक आणि दुकानदारांवर गुन्हा दाखल, विषबाधा प्रकरणी पोलिसांकडून कारवाई
नवरात्रोत्सव सुरू आहे... या काळात पंतप्रधान मोदींसह अनेक जण ९ दिवस उपवास करतात.. बरेच जणांसाठी या उपवासाच्या काळात भगर या पदार्थाचा आधार असतो... मात्र हीच भगर विषारी का ठरतेय असा प्रश्न पडलाय. कारण... औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये शेकडो नागरिकांना भगरीतून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. ऐन नवरात्रोत्सवात अशी विषबाधा होत असल्यानं नागरिक आणि प्रशासनही चिंतेत आहेत.