Dharashiv Juge : धाराशिव जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश बडतर्फ, औरंगाबाद खंडपीठाकडून गंभीर दखल
धाराशिव जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाला सेवेतून शुक्रवारी बडतर्फ करण्यात आले आहे. या न्यायाधीशाने खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपीला जामीन देत असताना बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वी दिलेला निकष जाणीवपूर्वक पाहिला नाही.
हे न पाहण्यामागं काही विशिष्ट हेतू असल्याचा औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशाचे मत आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित न्यायाधीशांनी दिलेला जामीन हा चुकीचा आहे, हे जिल्हा न्यायाधीशाच्या लक्षात आल्यानंतरच त्यांनी तात्काळ दिलेला जामीन रोखून धरला होता. या घटनेमुळे कनिष्ठ पातळीवरच्या न्यायालयीन प्रक्रियेतला गैरव्यवहार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.