Amit Thackeray : दोन शिवसेना आणि भाजपच्या राजकारणात मनसेला संधी : अमित ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे अजूनही राजकारणात फार बोलताना दिसत नाहीत. आपण बरं आणि आपल्या पक्षाचं काम बरं याच धोरणानं त्यांची पावलं पडताना दिसतायत. पण अमित ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या विधानानं राजकीय निरीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वडील राजकारणात आहेत म्हणून मी राजकारणात आलो, अन्यथा मी राजकारणात नसतो, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. सध्याची राजकारणातली परिस्थिती भयावह असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. शिवसेनेतले दोन गट आणि भाजपच्या राजकारणात मनसेला संधी असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.