Ambadas Danve : Abu Azmi यांच्या बातमीची किव करावीशी वाटते, अंबादास दानवेंची सडकून टीका

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त विधान केलंय.. औरंगजेब हा वाईट राजा नव्हता... त्याचा इतिहास समोर आणला तर सर्वजण त्याला चांगलाच म्हणतील... अशी मुक्ताफळं अबू आझमी यांनी उधळलीय... छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याने त्रास दिला... तो औरंगजेब हा चांगला राजा होता... असं वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केलंय.. दरम्यान अबू आझमींनी उधाळलेल्या या मुक्ताफळांवर अंबादास दानवेंनी सडकून टीका केलीय... आझमींनी त्यांच्या कुटुंबीयांची नावं औरंगजेब ठेवावीत असा सल्ला दानवेंनी दिलाय.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola