Abdul Sattar : सत्तारांच्या 'त्या' दाव्याला सुरुंग,दीपक गवळींची शिफारस केल्याचं पत्र 'माझा'च्या हाती
अब्दुल सत्तार यांच्या दाव्याला सुरूंग लावणारा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय. अब्दुल सत्तार यांच्या शिफारसीवरूनच दीपक गवळींची नियुक्ती करण्यात आलीय. १४ नोव्हेबर २०२२ रोजी दीपक गवळींची नियुक्ती केल्याचं आणि सत्तार यांची स्वाक्षरी असलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. त्यामुळे, अब्दुल सत्तार यांनी केलेला दावा खोटा असल्याचं निदर्शनास येतंय.