Abdul Sattar On Supriya Sule : ...तर मी सॉरी, अब्दुल सत्तार यांनी 'त्या' शब्दाबाबत मागितली माफी

Aurangabad News: नेहमीच राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहे.  विरोधकांवर टीका करतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील 24 तासांत अब्दुल सत्तार यांनी माघावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. 

औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान याचवेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी होत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola