Aurangabad मधील 30-30 स्कीम आर्थिक घोटाळ्यात किती कोटींची फसवणूक? सुनील राठोडचा आरोपांवर काय दावा?

Continues below advertisement

बार्शीतील विशाल फटे यानं केलेल्या घोटाळ्याची चर्चा असतानाच औरंगाबादमधल्या एका आर्थिक घोटाळ्याची आठवण ताजी झाली. ३०-३० ची योजना, ३० टक्के व्याज आणि ३० गावांतील लोकांची फसवणूक. औरंगाबादमध्ये गाजलेल्या या घोटाळ्याचा केंद्रबिंदू आहे संतोष राठोड हा तरुण. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप संतोष राठोड यांच्यावर आहेत. समृद्धी आणि डीएमआयसी प्रकल्पात ज्यांची जमीन गेली अशा शेतकऱ्यांना हेरून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप राठोडवर आहे. पण हा घोटाळा चारशे-पाचशे कोटींचा नाही, तर ६० ते ७० कोटी रुपये लोकांनी गुंतवले आहेत, असा दावा संतोष राठोड यांनी माझाशी बोलताना केलाय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram