Mumbai Drug Raid | मुंबईत अंमली पदार्थांचे कारखाने, गृहखातं झोपा काढतंय का? अतुल भातखळकरांचा सवाल

Continues below advertisement
मुंबई : मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत छापा टाकून एमडी ड्रग्सचा कारखाना उध्वस्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आले. परंतु मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाचे कारखाने उभे राहत असताना महाराष्ट्राचे गृह खाते आणि अंमलीपदार्थ विरोधी पथक झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram