आषाढी पालखी सोहळ्याची परंपरा अखंडित ठेवण्यावर विश्वस्तांच्या बैठकीत एकमत
Continues below advertisement
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याची परंपरा अखंडित ठेवण्यावर आजच्या बैठकीत एकमत झालं आहे. मात्र ही परंपरा अखंडित ठेवताना समाज आणि वारकऱ्यांचे आरोग्य आणि हित विचारात घेतलं जाईल. 13 जूनला पालखी सोहळा सुरू होत आहे. त्यावेळी कोरोनाची परिस्थिती कशी असेल हे पाहूनच अंतिम निर्णय घेण्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठरवण्यात आलं आहे. याबाबत सरकारशी ही चर्चा केली जाईल. त्यानंतर पालखी सोहळ्याबाबत जे ठरलंय त्यांचं वारकरी संप्रदायाने पालन करावे, असं आवाहन आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केलं आहे.
Continues below advertisement