Archana pail Vs Ranajagjitsinh : ओमराजेंना टोला, राणाजगजितसिंह यांचा अर्चना पाटलांना खोचक सवाल

Continues below advertisement

Archana pail Vs Omraje : ओमराजेंचा सहानुभूतीचा कार्ड आता जुना झालाय, अर्चना पाटलांचा टोलाओमराजे यांचा सहानुभूतीचा कार्ड आता जुना झालाय, घासून गुळगुळीत (over) झाला आहे.. धाराशिव मतदारसंघातील वीस लाख मतदारांना पाटील आणि निंबाळकर कुटुंबातील भाऊबंदकीशी काहीही देणं घेणं नाही... मतदारांना पुढील पाच वर्षात इथे काय विकास होणार आहे हे महत्त्वाचं वाटत असल्याची प्रतिक्रिया धाराशिवमध्ये ओम राजे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी दिली आहे... आजच एबीपी माझाशी बोलताना धाराशिव चे खासदार व माहविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपले वडील पवनराजे निंबाळकर यांचे हत्या प्रकरणी पाटील कुटुंबावर गंभीर आरोप करत, हिंमत असेल तर दोन महिन्यात फास्टट्रॅक कोर्टामध्ये हत्या प्रकरणाचा निकाल लावावा असे आव्हान अमित शाह यांना दिले होते... त्यानंतर अर्चना पाटील यांनी ओमराजे सहानुभूती कार्ड खेळत असल्याचा आरोप करत आता तुमचा सहानुभूतीचा कार्ड चालणार नाही असा हल्लाबोल केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram