Anti-Hindi Imposition | हिंदी सक्तीविरोधात ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा
हिंदी सक्तीविरोधात ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मोर्चात कोणताही झेंडा नसेल आणि संपूर्ण मोर्चा मराठी माणसाचा असेल. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, साहित्यिक यांनाही आमंत्रण दिले जाणार आहे. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात हिंदीची सक्ती करणार नाही असे जाहीर केल्यास हा विषय संपेल असे म्हटले आहे.