Arvind Kejriwal यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare यांनी निशाणा साधलाय : ABP Majha
दिल्लीतल्या मद्यधोरणावरून टीकेच्या घेऱ्यात अडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निशाणा साधलाय. मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्तेच्या नशेत तुम्ही आदर्श विचार विसरलात अशा कठोर शब्दांत अण्णांनी केजरीवालांना सुनावलं आहे.
अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहिलंय. केजरीवाल यांनी त्यांच्याच पुस्तकात नमूद केलेल्या दारु धोरणाची आठवण अण्णांनी करून दिलीय.