Anil Parab on ST Strike : संपकरी एस्टी कामगारांवर मेस्मा अंतर्गत कारवाई कारणार
मेस्मा हा कायदा (Mesma Act) अत्यावश्यक सेवेसाठी लावला जातो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याबाबत आम्ही गंभीर आहोत. लवकरच आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कारवाई करूअसा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकारी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांची मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब (Anil Parab) बोलत होते.