Anil Parab | डबेवाल्यांच्या लोकल प्रवासासाठी लवकरच क्यूआर कोडची व्यवस्था करणार - अनिल परब
Continues below advertisement
डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळाली परंतु याबाबतचा जीआर रेल्वे विभागाला न मिळाल्यामुळे तुम्हाला क्यूआर कोड मिळणार नाही अशी माहिती रेल्वे विभागाकडून दिली गेल्याची तक्रार मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे. दुसरी महत्त्वाची बाब अनेक डबेवाल्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यामुळे जरी परवानगी मिळाली तरी आमचे डबेवाले पास कसा काढणार अशी अडचण डबेवाला असोसिएशनने व्यक्त केली आहे. डबेवाल्यांनी आम्हांला ऑफ लाईन पास मिळावा अशी मागणी केलीय.
Continues below advertisement