Sindhudurg : आंगणेवाडी आणि कुणकेश्वर इथल्या प्रसिद्ध यात्रा यावर्षी कोविडचे नियम पाळून होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी आणि कुणकेश्वर इथल्या प्रसिद्ध यात्रा यावर्षी कोविडचे नियम पाळून होतील, असं आज प्रशासन आणि देवस्थान समित्यांच्या बैठकीत ठरवण्यात आलं. एका वेळी ५० भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल अशा पद्धतीनं दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज कुडाळमध्ये बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यार्षी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा २४ फेब्रुवारीला होणार आहे. तर महाशिवरात्रीला कुणकेश्वरची यात्रा होते.