Ravi Rana Welcome Palkhi : रुख्मिणी मातेची पालखी अमरावतीत;आमदार रवी राणांकडून स्वागत

Continues below advertisement

Ravi Rana Welcome Palkhi : रुख्मिणी मातेची पालखी अमरावतीत;आमदार रवी राणांकडून स्वागत
विदर्भाची पंढरी आणि आई रुख्मिनी मातेची पालखी काल सायंकाळी अमरावतीत दाखल झाली.. रात्री एकविरा मंदिरात पालखीच मुक्काम झाल्यावर आज सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. आज सकाळी राजापेठ चौकात आमदार रवी राणाकडून या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.. आई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा 430 वर्षांपासून सुरू आहे.. आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केल्या जाते...  आज सकाळी रुख्मिणीच्या पायदळ पालखीचे अमरावती मधील राजपेठ चौकात आमदार रवी राणा यांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले आणि याच ठिकाणी वारकऱ्यांनी हनुमान चालीसा पठण सुद्धा केले. यावेळी आमदार रवी राणा टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झाले होते, यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात भाविकांनी माता रुक्मिणीच्या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram