Ravi Rana On Baccu Kadu : रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार : ABP Majha
Continues below advertisement
५० खोक्यांवरुन रवी राणांनी बच्चू कडूंबाबत केलेलं वक्तव्य मागे घेतलं असलं तरी कडू यांचा आक्रमक बाणा कायम आहे. आज अमरावतीमध्ये होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बच्चू कडू आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत... काल बच्चू कडू यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कडू समर्थकांनी तीन भूमिकेत असल्याचे संकेत दिलेत... सरकारमध्ये राहायचं, बाहेरुन पाठिंबा द्यायचा की तटस्थ राहणार याबाबतची अधिकृत घोषणा आज बच्चू कडू करण्याची शक्यता आहे... दुसरीकडे बच्चू कडू समर्थक आक्रमक झालेत... मैं झुकेगा नहीं अशा आशयाचे बॅनर्स अमरावतीमध्ये झळकलेत.. त्यामुळे रवी राणांबाबत कडू काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागलीय..
Continues below advertisement