Prahar Rasta Roko:बच्चू कडूंचं आंदोलन, अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहारचं रास्तारोको सुरू

Bachchu Kadu Protest Special Report : शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा एल्गार, आंदोलनाचा 'प्रहार'

शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीच्या मोझरी इथे आंदोलन सुरु केलंय. गेल्या चार दिवसांपासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची व्याप्ती आता चांगलीच वाढलीये. अनेक नेते आंदोलनस्थळी येऊन बच्चू कडूंची भेट घेतायत. याच दरम्यान बच्चू कडूंची तब्येत मात्र ढासळलीये... या आंदोलनात नेमकं काय काय घडलंय? पाहूयात...
अमरावती बच्चू कडूच्या अन्नत्याग आंदोलनाला त्यांच्या पत्नी नयना कडू यांची भेट...  बच्चू कडूंची पत्नी नयना कडू ह्या बच्चू कडूंची विचारपूस करण्यासाठी दाखल..  नयना कडू आणि बच्चू कडू यांचा संवाद सुरू.  बच्चू कडू यांचा मुलगा देवा कडू देखील बच्चू कडू यांना भेटण्यासाठी दाखल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola