Paratwada शहरात दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्यावरून दोन समाजामध्ये वाद
परतवाडा शहरात दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्यावरून दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन वाद मिटविले. पण यावेळी काहींनी किरकोळ दगडफेक केली ज्यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. या प्रकरणी परतवाडा पोलीसांनी काल तिघांना आणि आज सकाळी दोघांना असे एकूण पाच जणांना अटक केलीय. सध्या परतवाडा शहरात शांतता असून पोलीस बंदोबस्त लावले आहे.