Amravati Madhya Pradesh : गोवंशाची वाहतूक, ग्रामस्थांचा हल्ला; MP Anil Bonde यांची प्रतिक्रिया
मध्य प्रदेशातल्या नर्मदापुरमध्ये गोवंशानं भरलेल्या एका वाहनाचा अपघात झाला... अपघातनंतर वाहनातली जनावरं पाहून ग्रामस्थांना गोवंश तस्करीचा संशय आला आणि त्यांनी वाहनातल्या चालक आणि अन्य दोन जणांना मारहाण करण्यास सुरुवात केली... पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही त्यांनी अक्षरशः पाठलाग करत या तिघांना मारलं.. पोलिसांनी सुटका करत चालक आणि अन्य दोघांना रुग्णालयात दाखल केलं.. मात्र तिथे एकाचा मृत्यू झाला.. तर दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत.. मृत आणि जखमी महाराष्ट्रातल्या अमरावतीचे असल्याची माहिती मिळतेय.