Amravati Achalpur Lockdown | अमरावती, अचलपूर शहरात आठ दिवसांचा लॉकडाऊन
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली असून उद्यापासून सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.