Ravi Rana - Bachchu Kadu यांना वर्षावर बोलावणं, मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री वाद मिटवणार?
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.. या वादावर आज तोडगा निघणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय... या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षावर भेटीसाठी बोलावलंय.. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय.. तर पैसे घेतल्याचे रवी राणांनी पुरावे द्यावेत अन्यथा मानहानीचा दावा दाखल करु असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.. या वादात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केलीय.. मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांना दुपारी १२ वाजता वर्षावर भेटीसाठी बोलावलंय. यावेळी मुख्यमंत्री दोघांशी संवाद साधत वाद मिटवण्याची शक्यता आहे...