Navnit Rana: शिधा वाटपावरून टीका झाल्यानंतर राणांच्या कार्यकर्त्यांकडून बच्चू कडूंना उत्तर
बच्चू कडूंनी रवी राणांच्या किराणा वाटपावर टीका केली. या टीकेनंतर आज रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंच्या बेलोरा गावात मोफत किराणा वाटप केलंय. एकूणच गरजूंना किराणी वाटप करतानाही राज्यात राजकारण पेटल्याचं दिसतंय.