Bachchu Kadu on Ravi Rana :फडणवीसांना भेटल्यानंतर रवी राणा जोरजोरात बोलायला लागले, बच्चू कडूंचा टोला
Bachchu Kadu on Ravi Rana :फडणवीसांना भेटल्यानंतर रवी राणा जोरजोरात बोलायला लागले, बच्चू कडूंचा टोला
एनडीए मध्ये असणारे सर्व नेते नवनीत राणा यांचा प्रचार करतील आणि त्यांना मी एका मंचावर आणेल आणि त्यांना नवनीत राणाचा प्रचार करावाच लागेल.. असा इशारा रवी राणा यांनी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पेक्षा मी रवी राणांना घाबरतो, खूप भीतीच वातावरण तयार झाला आहे. त्यांनी सांगितलं की मंचकावर राहावंच लागेल, मला कार्यकर्त्यांचे फोन आले एवढी मोठी हस्ती काहीही करू शकते उद्या, जीवाला धोका निर्माण होऊ शकते, चौकशी लावू शकते. ते देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर ते जोर जोराने बोलतात. त्यामुळे आम्हाला भीती आहे. आम्ही घाबरलेलो आहे. आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावं लागेल. प्रचार करावा लागेल आमची मोठी नामुसकी होईल, कठीण झाला आहे.