Bacchu Kadu | सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर तुमचा सामना माझ्याशी : बच्चू कडू | ABP MAJHA

अमरावती : सरकारी कामात अडथळा आणला तर कलम 353 नुसार सर्वसामान्य नागरिकावर कारवाई होते, मग कामात दिरंगाई करणाऱ्यांवरही सेवा हमी कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना दिला आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसीलमध्ये दोन अधिकाऱ्यांना कामात हलगर्जीपणा केल्यामुळे आज बच्चू कडू यांनी निलंबित केलं. या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी आज जिल्ह्यात आलो त्यावेळी दर्यापूर तहसील कार्यालयात अचानक भेट दिली. यावेळी तिथं पवार नावाचे एक वृद्ध शेतकरी माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की अंत्योदयमध्ये कार्ड मिळावं यासाठी ते प्रयत्न करत होते. यानंतर मी तहसीलदारांकडे याबाबत चौकशी केली. त्यांची कागदपत्रं आणि फाईल पहिली तर त्यावर एक वर्षांपासून काहीच कार्यवाही केली नव्हती. ते म्हणाले की, सेवा हमी कायदा सांगतो की सात दिवसांच्या आत कार्यवाही व्हावी, फाईलवर कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होते. मी आज त्या अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे आदेश दिले आहेत, असे बच्चू कडू यांनी सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola