Bacchu Kadu : नाराज नाही पण...CM Eknath Shinde यांच्या भेटीनंतर बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य

Bacchu Kadu Meets CM Eknath Shinde : "थोडी नाराजी आहे, पण एवढी जास्त नाराजी नाही की गट सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ," अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली. बच्चू कडू यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी मंत्रिपद न मिळाल्याने थोडी नाराजी असल्याचं म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola