Amravati Voting : शरीरातून घामाच्या धारा वाहत असतानाही मतदार मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावतायत
काल झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सकाळपासून उष्णतेचा कहर बघायला मिळत आहे. त्यामुळे सकाळपासूनच वातावरणात निर्माण झालेल्या बदलाचा फटका आता मतदारांना बघायला मिळत आहे. शरीरातून घामाच्या धारा वाहत असतानाही त्याची तमा न बाळगता मतदार मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर पोहोचत आहेत. अशात काही महिला, माताही त्यांच्या चिमुकल्यांसह मतदान केंद्रावर पोहोचल्याचं चित्र अमरावती शहरातील तपोभूमीमधील मतदान केंद्रावर बघायला मिळालं....याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी....