Amravati Talathi Exam : राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू , लाखो परिक्षार्थींचा खोळंबा

Continues below advertisement

राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षेत आज सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं होतं. सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. 
४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी एकूण १० लाख ४१ हजार अर्ज आलेत. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झालेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील, का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत व्हायला सुरुवात झालीय. सकाळी ९ ते ११ या वेळेत ही परीक्षा होती. मात्र अजूनही परीक्षा सुरू होऊ शकलेली नाही.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram