Amravati : रुख्मिणी माता मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून भाविकांच्या रांगा
Amravati : रुख्मिणी माता मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून भाविकांच्या रांगा सलग तीन वर्षानंतर येणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास निमित्य विदर्भाचे प्रतिपंढरपूर आणि माता रुख्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावतीच्या श्री क्षेत्र कौडण्यपूर येथे हजारो भाविकांची मांदियाळी सध्या पहायला मिळत आहे. या महिन्यात तिर्थक्षेत्रावरील पवित्र स्नानाला अधिक महत्व असल्याने आद्य तीर्थक्षेत्र असलेल्या कौडण्यपूरच्या वशिष्ठ (वर्धा) नदीपात्रात पवित्र स्नानासाठी भाविकांची पहाटे 5 वाजता पासूनच गर्दी पहायला मिळते. पवित्र स्नानानंतर भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन, तसेच रुख्मिणी हरण मंदिर म्हणजेच श्री अंबिका माता मंदिर येथे दर्शन घेऊन अधिक मासातील आपले व्रत पूर्ण करतात. गेल्या महिनाभरापासून भाविक कौडण्यपूरात येऊन आपली आराधना मोठ्या भक्तिभावाने पूर्ण करीत असून सध्या कौडण्यापूरात मोठी यात्रा भरली आहे...