Amravati : Makar Sankranti चा मुहूर्त, अमरावतीमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमांचं आयोजन

Amravati : Makar Sankranti चा मुहूर्त, अमरावतीमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमांचं आयोजन

महाराष्ट्र योग शिक्षक संघ तसेच जेसीआय अमरावती गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आयूष मंत्रालयाच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या महापर्वावर अमरावतीच्या ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात आज सकाळी 6 ते 7 पर्यंत भव्य सामूहिक सुर्यनमस्कार कार्यक्रमाचे भव्य प्रमाणात आयोजन होणार आहे. 15 जानेवारी या दिवशी सुर्याला अर्ग दिल्या जातो तसेच सुर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते म्हणून या दिनाचे औचित्य साधून सुर्यनमस्कार घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उपस्थित योगार्थ्यांना सुर्यनमस्काराचे महत्व, योगाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले गेले. याप्रसंगी मोठ्या संख्येने योगप्रेमींची उपस्थिती होती.  आयूष मंत्रालयाचे माध्यमातून संपूर्ण विश्वाला महामारी पासून वाचविण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी प्रत्येक घरोघरी, विभिन्न स्थळी संपूर्ण देशभर हा उपक्रम राबविण्यात येते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola