Amravati Lady BSF Soldier:भारत-पाक तणावामुळे सुट्टी रद्द,BSF महिला जवान रेश्मा इंगळे सीमेवर निघाल्या

Continues below advertisement

अमरावती : डोळ्यात अश्रू, बाळाला घरी सोडून आई गेली सिमेवर...

Anc - सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती असल्याने सगळ्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना ड्युटीवर बोलविले.. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील बोरगाव पेठ येथील बीएसएफ महिला जवान रेश्मा इंगळे ह्या 15 दिवसाच्या सुट्टीवर आपल्या गावी आल्या होत्या पण त्यांना तातडीने ड्युटीवर हजर व्हायला सांगितले.. यावेळी सिमेवर जातांना त्या महिला जवानाच्या डोळ्यात अश्रु पाहून तुमचही मन सुन्न झाल्याशिवाय राहनार नाही कारण त्या एका वर्षाच्या बाळाला सोडून देशाच्या रक्षणासाठी गेल्या...

बीएसएफ महिला जवान रेश्मा इंगळे यांना एक वर्षाचा मुलगा आहे.. त्यांना आठ दिवसच झाले होते इकडे येऊन पण आधी देशसेवा मग कुटुंब म्हणत त्या आपल्या एक वर्षाच्या बाळाला सोडून पाकिस्तानच्या बॉर्डरवर ((अमृतसर)) रवाना झाल्या.. रेश्मा इंगळे मार्च 2013 मध्ये बीएसएफ मध्ये रुजू झाल्या सुरुवातीला त्यांची पंजाबमध्ये ट्रेनिंग झाली त्यांनतर बांगलादेश बॉर्डरवर त्रिपुरा याठिकाणी होत्या तिथून कछ पाकिस्तान बॉर्डरवर आणि सध्या त्या पाकिस्तान बॉर्डर पंजाबमध्ये याठिकाणी तैनात आहे.. 

15 दिवसाची सुट्टी घेऊन रेश्मा इंगळे ह्या आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आल्या होत्या पण सीमेवर तणाव निर्माण झाल्याने त्यांना तातडीने ड्युटीवर बोलविले.. बाळ ढसाढसा रडत होता आणि बाळाची आई जवान रेश्मा इंगळे यांच्या डोळ्यातून पाणी आले.. सासूच्या डोळ्यातही अश्रू फुटले.. रेश्मा इंगळे यांचे पती भारत इंगळे गुजरातमध्ये एका बँकेत असिस्टंट मॅनेजर आहे आपली नोकरी सोडून ते बाळाला सांभाळायला आले.. भारत इंगळे म्हणतात मला गर्व आहे की माझी बायको देशाच्या सीमेवर राहून देशाची सुरक्षा करते..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola